Email: dinkarkumbhar76@gmail.com Phone: 9921616276

अशी झाली सुरूवात

कोल्हापूरची कला म्हणजे वास्तववादी निसर्गचित्र हे समीकरण असले तरी काही कलाकार नव्या वाटांवर चालताना दिसतात. त्यातील एक नाव म्हणजे दिनकर शंकर कुंभार. भारतीय संस्कृतीशी नाते सांगणारे विषय आणि पाश्चिमात्य कलाक्षेत्रात दबदबा निर्माण करणारी कलाशैली यांचे अनोखे मिश्रण त्यांच्या कलाकृतीत दिसते. त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र चित्रशैली निर्माण केली आहे. मुळातच घनवादी चित्रकृती दुर्बोध, अनाकलनीय मानल्या गेल्यातरी त्यातील ताकत मात्र अफाट आहे. बोद्धिकतेचा आणि कौशल्याचा कस पाहणाऱ्या या कलाशैलीने प्रभावित झालेल्या चित्रकाराने त्यात वेगवेगळे प्रयोगही केले. त्यामुळे वेगवेगळ्या रूपात हि शैली रसिकांसमोर आली. 


डी. एस. कुंभार यांना कलाशिक्षण घेत असल्यापासूनच क्युबिझमबद्दल आकर्षण निर्माण झाले. त्यांनी घनवादाच्या अभ्यासावर लक्ष्य केंद्रित केले. क्युबिझम या विषयावर प्रबंध लिहिला. दळवीज आर्ट इन्स्टिटयूट कोल्हापूर मधून जी. डी. आर्ट (ड्रॉईंग अँड पेंटिंग) पूर्ण केलेल्या कुंभारांनी व्यवसायिक कलाक्षेत्रात बरेच वर्ष वेगवेगळ्या पद्धतीचे काम केले. त्यामधून क्युबिझमचा प्रभाव होता. कोल्हापूरची खासियत असणाऱ्या वास्तवदर्शी कलाशैलीत चित्रे त्यांनी रेखाटली असलीतरी त्याबरोबरीने घनवादाचा अभ्यास आणि त्यासंदर्भात वेगवेगळे प्रोयोगही सुरु केले होते. वेगवेगळ्या संकल्पनांची मांडणी करण्यासाठी घनवादाच्या साऱ्या शक्यता ते पडताळून पाहत होते. त्यासाठी त्यांनी शेकडो रेखाटने केली, चित्रांकने भोमितीक आकारातून गोल, चोकोन, त्रिकोण आदी आकारातून केली. आकार, रंगसंगती मांडणीचा वेगवेगळा विचार होत राहिला यासाऱ्या अभ्यासातून त्यांनी स्वतंत्र एक घनवादात शैली आत्मसात केली जी या माताशी, संस्कृतीशी बांधिलकी सांगणारी आहे

© Dinkar Khumbhar